ज्ञानपीठाची वैशिष्ट्ये
१. महाराष्ट्रातील पहिले आणि विदर्भातील एकमेव डिजीटल वारकरी ज्ञानपीठ.
२. वारकरी ज्ञानपीठातील शिक्षण केवळ अभ्यास किंवा करिअरपुरतं नव्हे तर जीवनशिक्षण म्हणून आयुष्यभर विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारं.
३. वारकरी संप्रदायाच्या शिक्षणाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना शालेय आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यात येते. विद्यार्थांचे ज्या सफाईने टाळ-मृदंगाच्या तालावर पावले थिरकतात त्याच सफाईदारपणे ते कॉम्प्युटरचा माऊस ही फिरवतात.
४. गुरुकुल निवासी ज्ञानपीठात ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण.
५. विद्यार्थ्यांची शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची संपूर्ण व्यवस्था संस्थेच्या वतीने नि:शुल्क केली जाते.
६. वारकरी शिक्षण शिकवण्याकरिता आळंदीचे आचार्य आहे. तसेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील तज्ञांद्वारे वारकरी शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला.
७. आधुनिक तंत्रज्ञानाचा समाविष्ट असलेला संगणकाचा अभ्यासक्रम
८. विद्यार्थ्यांना व्यायाम, योगा आणि आत्म स्वरक्षणाचे धडे देतात.
९. विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर चर्चासत्र आणि कार्यशाळेचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
१०. दर वर्षी विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि अध्यात्मिक सहल जाते.
