ज्ञानपीठाची यशोगाथा


१. ‘ रमाबाई रानडे स्मृती शिक्षण - प्रबोधन पुरस्कार -२०२६ ’ या पुरस्काराने सन्मानित. अध्यात्मिक गुरु प.पू. गोविंद देव गिरीजी महाराज आणि केंद्रीय मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते २ जानेवारी २०२६ रोजी सेवा सदन शिक्षण संस्था नागपूर येथे प्रदान करण्यात आला.

२. माऊली कृपांकित आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठाच्या कार्याचे माहिती पट सह्याद्री वाहिनेवर ‘तंत्र – ज्ञानमयोसी’ या भागात प्रसारित.

३. प्रज्ञाचक्षु ज्ञानेशकन्या संत श्री गुलाबराव महाराज संस्थान येथे दरवर्षी होणाऱ्या वारकरी शिबिरात २०२४ साली वारकरी ज्ञानपीठाचा विद्यार्थी श्री श्रवण महाराज वानखडे यांचा प्रथम क्रमांक आला.

४. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय कुऱ्हा इथे भाषण स्पर्धा घेण्यात येते यामध्ये वारकरी ज्ञानपीठातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट भाषणासाठी निवड झाली आहे.

५. दहावीच्या स्टेट बोर्ड परिक्षेत २०२४ साली वारकरी ज्ञानपीठाचे विद्यार्थी श्री सार्थक महाराज भुजाडे यांचा ९२ % घेऊन प्रथम क्रमांक आला. तसेच २०२४ साली श्री ऋग्वेद महाराज ढाकुलकर यांना ८४.८० % प्राप्त केले.

६. पंढरपूर येथे २०२५ या वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी ज्ञानपीठातील श्री ह भ प कार्तिक महाराज आळे यांनी प्रथमच उत्कृष्ट कीर्तनसेवा सादर केली.

७. वारकरी ज्ञानपीठातील विद्यार्थ्यांची चार वर्षांतील प्रगती ही वाखाण्यासारखी आहे. ७ विद्यार्थी कीर्तनकार,५ विद्यार्थी उत्कृष्ट पखवाज वादक ,६ विद्यार्थी उत्कृष्ट गायक म्हणून चांगल्या प्रकारे सामाजामध्ये नाव कमावले आहेत.

Create your account